रमेश लिंबोरे
पैठण मोठ्या संघर्षातून व कोट्यावधी रुपये खर्च करून संत ज्ञानेश्वर उद्यान पर्यटकासाठी खुले करण्यात आले. उद्यानात करण्यात आलेले कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची करण्यात आली असल्याने तत्कालीन पालकमंत्री संदिपान भुमरे व जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पाहणी करून कामाच्या दर्जाबाबत संताप व्यक्त केला होता मुक्कामी दर्जे दार करा असे आदेश दिले होते परंतु या आदेशाला अधिकार्यांनी केराची टोपली दाखवली असल्याचे दिसत आहे.
फुलझाडे झाली नष्ट
एकेकाळी गुलाबाच्या फुलासाठी प्रसिद्ध असलेल्या संत ज्ञानेश्वर उद्यानातील गुलाबांच्या फुलासह इतर फुलझाडे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नष्ट झाली आहेत. पर्यटकांच्या आकर्षणासाठी संत ज्ञानेश्वर उद्यानातविविध रंगीबेरंगी गुलाबाचे झाडे, निशिगंधा, कर्दळी तसेच
इतर फुलझाडे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नष्ट झाली आहेत जी आहेत त्या गुलाबाच्या झाडांना जांभेरी फुटल्या असून या जांभेरीची कटिंग करण्यात आली नसल्याने झाडांना झांबरे फुटून ती वाया गेली आहेत कै. शंकरराव चव्हाण यांच्या पुतळ्या मागे लावण्यात आलेले निशिगंधाची झाडे सुद्धा नष्ट झाली असून एकही झाड शिल्लक नसल्याचे दिसत आहे. कर्दळी सुद्धा पाणी अभावी जळून खाक झाले आहेत. इतर बेड मध्ये मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले दिसत आहे.
जुन्याच मातीवर लावली झाडे
संत उद्यानात लावण्यात आलेली फुलझाडे नष्ट होण्याचे मूळ कारण म्हणजे या बेड मधील माती बदलण्यात आली नाही. फुल झाडे लावताना या बेड मधील माती बदलणे आवश्यक होते. परंतु झाडे लावायचे दाखवून मंत्र्यांचे व अधिकाऱ्यांची दिशाभूल करायची हा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचा यामागील उद्देश होता. उद्यानात लावलेली इतरही शोभिवंत झाडे पाण्याअभावी जळून गेली आहेत.
उद्यानातील संगीत कारंजा जवळ लावण्यात आलेली हिरवळ ही पाण्याअभावी वाळून जाताना दिसत आहेत. संत ज्ञानेश्वर उद्यान जागतिक दर्जाचे व्हावे यासाठी त्कालीन पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. परंतु या निधीची अधिकाऱ्यांनी पूर्णपणे विल्हेवाट लावली असल्याचे दिसत आहे सर मध्ये मोठ्या प्रमाणात शेवाळ झाले असल्याने दुर्गंधी सुटत आहे यामुळे
पर्यटकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बाहेरून आलेल्या पर्यटकांना फक्त संगीत कारंजे पाहायला मिळत आहे. त्यामुळे या उद्यानात आलेले पर्यटक जाताना मात्र अधिकाऱ्यांना शिव्यांची लाखोली वाहून जात आहेत. उद्यानातील गैर कारभाराकडे आमदार विलास भुमरे यांनी लक्ष देणे गरजेचे आहे व उद्यानाच्या विविध अडीअडचणी संदर्भात तात्काळ बैठक लावावी अशी मागणी उद्यान विकास समितीतर्फे करण्यात आली आहे.













